ईश्वर गवसे तिथेच जिथे..
नको भव्य प्रासाद अन्
आरास ही माणकांची;
नको थोर संबोधने
नच् अर्घ्ये पाप-पूण्यांची!
नको मूढ श्रद्धा
आचमनेही नकोचं स्वार्थाची;
नको रे नको लाच ती
मंत्राभिषेकांची!
नको ध्यास नश्वराचा अन्
ओढ अशाश्वताची;
नको वाहूस ओंजळीत तू
फुले कागदी सात्विकतेची!
हो नितळ निर्झर अंतरीचा
पूजा करुनि सृजनाची;
ईश्वर गवसे तिथेच जिथे
फुले फुलती चैतन्याची!
ईश्वर गवसे तिथेच जिथे
फुले फुलती चैतन्याची!!
टिप्पण्या