जाई..
अंगणातली मोहक जाई
मंद तिचा दरवळ
शांत, शुभ्र अस्तित्वाला
मुग्ध निर्माल्याचा परिमळ
प्रत्येकाच्या घरात असते अशी एक जाई
सदैव अवती-भवती दरवळणारी आपली आई
जिच्या सुगंधात घर प्रसन्न ठेवण्याची विलक्षण ताकद असते,
जिचं असणं कायम गृहीत धरलं जातं,
निखळ माया आणि कष्टांच्या बदल्यात जिला बहुतेक वेळा चिडचिड आणि
'तुला काय कळतंय?' हे ऐकून घेण्याची तयारी ठेवावी लागते,
अशी, मिरवणासारखी, असूनही नसण्याची कला अवगत असणारी आई!
जाई आणि आई मध्ये आणखी एक साम्य आहे,
दोघीही तशा दुर्लक्षितच असतात
पण काळोख्या ढगाळ रात्री, जेव्हा मन गलबलून जातं,
तेव्हा ते शांतवण्यासाठी,
अंगणातल्या आणि घरातल्या या जाई कडेच धावावं लागतं..!!

टिप्पण्या