माया..
माझ्या आज्जीच्या मायेत
गोड गुळाचा गोडवा,
मऊ, नाजुक स्पर्शाला
नाही कशाची उपमा
मनं शांतवण्याची आहे
तिच्या सुरांत ताकद,
सुरकुतलेल्या हातांना
अन्नपूर्णेचे वरदान
आजोबांची थोडी
मिजास मिश्कील,
चेष्टा मस्करीला त्यांच्या
दाट मायेचे कोंदण
भाग्य माझं मोठं,
मी नात या दोघांची
शिकवली दोघांनी
रीत जगण्याची मनस्वी
ठिकाण हे माझे विसाव्याचे,
स्वार्थापलीकडे जाऊन निखळ मायेत नाहण्याचे..
~ संजीवनी
टिप्पण्या