नि:शब्द


नि:शब्दाची गाणी गातात ओठ आताशा
नि:शब्दाची स्तोत्रं झरतात मनी आताशा
ओल्या पावसाळी सांजेला, 
गूढ नि:शब्दतेची ओली किनार आताशा
शुभंकरोतीचा नाद नि:शब्द,
नि:शब्द काजळी देवासमोरच्या दिव्यात आताशा
साध्य-सिद्धतेच्या पलिकडे मन,
मनातला कोलाहलही भासे नि:शब्द आताशा..

~ संजीवनी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट