पाऊस..




पाऊस

सर्द पावसाळी वळणे
गर्द थेंबाळणारी पाने
धुंद धुक्याच्या पल्याड
गंध वेचणारी मने

टेकडीवरच्या देवालयी,
पंचमहाभूती अभिषेक;
मंत्रपुष्पांजलीत लीन,
चाफा शांत शुचिर्भूत 

ओघळ ओघळ पाषाणीं
फेसाळणारी दुग्ध लेणी
व्याकूळ उमाळे दाटलेले
मुक्त व्हावे जळी-क्षळी

गार गार हिरवा वारा
चढे न ज्वर नच शहारा
हळूचं जागवी सुप्त मनाला 
मनी फुले सृजन पिसारा

सुख हे असे मनास स्पर्शणारे
मन हे असे अल्लद तरंगणारे
डोळे शांत निपचित आत उघडणारे
झरे हे पावसाचे डोळ्यांत निथळणारे

~ संजीवनी


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट