वेड..
आभाळाचं वेड
भुईच्या मनाला
चातकाचा स्पर्श
व्याकुळ सरीला.
थोडं माहेर माहेर
कातर डोळ्यांना
जाईचा रे बहर
कुंतली स्वप्नांना.
कशी कथावी कथावी
वेडगळ ही कथा.
कसे गुंफावे गुंफावे
शब्द, सांज ढळताना
वाटेवर ओळखीच्या.
नुरले ओळखीचे कोणी
मनभर सुगंधाना
कशी साठवू रितेपणी
एक पदर पदर
आईच्या रे मायेचा
ठेवून वेशीवर, मी
निघाले या प्रवासा
चुलीवर भाकरीचा
चंद्र रेखता रेखता
मनात रेंगाळतो
पहाटेचा सांजसखा
वाट ही आव्हानांची
अबोल अवीट मिरवणाची
चालता चालता, लागेल कदाचित
संगती मलाही, क्षितीज सावल्यांची
~ संजीवनी
टिप्पण्या