नागपंचमी.. समज, गैरसमज आणि तथ्य!




नागपंचमी हा सण लहानपणी एखाद्या उत्सवा सारखा वाटायचा. आठ-दहा दिवस आधीच त्यासाठीची खरेदी व्हायची. अगदी हेअर बॅंड पासून कानातल्या-गळयातल्या पर्यन्त सगळं हौसेने घेतलं आणि घातलं जायचं, हो तेव्हा 'कानातलं-गळ्यातलं' असच म्हणायचे सगळे, फॅशन ज्युलरी वगैरे टर्म्स आत्ता-आत्ताच्या आहेत! आदल्या दिवशी रात्री सार्‍या बायका-मुलींचा मेंदीचा कार्यक्रम रंगायचा.. त्यात मग तुझी चांगली की माझी वगैरे स्पर्धाही असायची. सकाळी उठून आवर्जून कोणाची मेंदी किती रंगलीये पाहणं याची उत्सुकता तर खूपच.. खूप मजा वाटायची या सगळ्याची तेव्हा.  घरोघरी नाग देवतेची पुजा व्हायची. माझी आई कागदावर नागाचं चित्र काढून त्याची पुजा करायची.. ज्वारीच्या लाहयांना त्यादिवशी खूप महत्व असायचं. पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे, पचायला हलक्य असलेल्या या लाहया पौष्टिक आणि पोशक दोन्ही ठरतात. नागपंचमीचं आणखी एक आकर्षण म्हणजे, संध्याकाळी रंगणार्‍या भुलया.. यात सगळ्या बायका-मुली गोल फेर धरून गाणी म्हणतात. मराठवाड्यात याला भुलई खेळणे म्हणतात, इतर ठिकाणी भोंडला असा शब्द आहे.. संकल्पना मात्र तीच! केलेली सगळी खरेदी सगळ्याजणी यावेळी मिरवून घ्यायच्या. एकूण या सगळ्या प्रकाराची तेव्हा खूप हौस वाटायची. मग जसे जसे मोठे होत गेलो, तसतसं हे सारं मागे पडत गेलं. 


पुढे मग नागपंचमी साजरी करण्या मागचे इतर अस्पेक्ट्स जास्त खुणाऊ लागले. 


हिंदू संस्कृती मध्ये देव हे केवळ मनवरूपी कधीच मानले गेले नाहीत.. तर्‍हेतर्‍हेच्या वनस्पती आणि प्राण्यांनासुद्धा देवाइतकच महत्वाचं स्थान दिलं गेलय. त्यात मग वराहा पासून श्वाना पर्यन्त सारे आले. आणि या सार्‍यामद्धे खूप वरचं स्थान आहे ते नाग देवतेचं!
शेषनाग श्री विष्णुंची शय्या झालेला आपल्याला माहीत असतं, याचं शेषनागाने बाळकृष्णाच पावसापासून रक्षण ही केलेलं होतं.. वासुकीने समुद्रमंथनाच्या वेळी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आदिदेव महादेवांनी त्याला स्वत:च्या गळ्यात दागिन्या 
प्रमाणे मिरवलं आहे. नागदेवतेची मंदिरं आणि प्राचीन पाषाण मूर्ती तर अगदी गावोगावी सापडतील. असच एक मंदिर मध्यप्रदेशतल्या उज्जैन मध्ये आहे, नागचंद्रेश्वर मंदिर! या मंदिराच विशेष हे की ते वर्षातून फक्त एकदाच नाग पंचमीच्या दिवशीच उघडल जातं बाकी पूर्ण वर्षभर ते बंद असतं. परमार राजा भोज यांनी इसवी सन १०५० मध्ये हे मंदिर बांधलं होतं. नंतर इ.स. १७३७ मध्ये शिंदे घराण्याच्या राणोजी शिंदेंनी त्याचा जिर्णोद्धार केला.



तर अशा या नागांच्या पुजनामागे एक अतिशय सुंदर मनोवैज्ञानिक तत्वही आहे. नाग/सर्प हे वेदांमध्ये मानवी ‘ego’ चं प्रतिक मानले गेले आहेत. इगो म्हणजे अहंकार! इगो ही गोष्ट मुळात वाईट नाही. स्व च्या प्रत्ययासाठी तो आवश्यकही आहे. पण uncontrolled ego मात्र वाईट असतो, प्रसंगी तो प्राणघातकही ठरतो. या इगो ला अंकित करणं म्हणजेचं आत्मभान प्राप्त करणं.. आणि हे साध्य करण्यासाठी ‘Humility’ चं आचरण (म्हणजेचं विनम्रता, आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही याची सततची जाणीव) हा एकमेव प्रभावी उपाय आहे. शिवाच्या गळ्यातला वासुकी, विष्णूची शय्या झालेला अधोमुखी शेषनाग ही या अंकित केलेल्या इगो चीच प्रतिकं आहेत. देवांनी त्यांच्या अहंकाराला अंकित करुन तो नंतर दागिन्या सारखा मिरवला असा त्याचा अर्थ.. आणि नागपंचमीला नागांची पुजा करणं म्हणजे इगो अंकित करण्याचा प्रयत्न करणं हेचं त्या पुजेचं साध्य असायला हवं. 

आता कोणी म्हणेल, हा चांगला इगो आणि वाईट इगो ओळखावा कसा? तर सोप्पय.. स्वत:विषयी सकारात्मक विचार करणं म्हणजे चांगला इगो आणि केवळ स्वत:विषयीचं तो करणं, इतरांना सदैव कमी लेखणं हा वाईट इगो!  चांगला इगो हा दागिना ठरतो तर वाईट इगो आत्मघातकी!

सापांचा असा इगो सदृश संदर्भ ख्रिश्चनांच्या ओल्ड टेस्टामेंट मधल्या ॲडम आणि ईव्हच्या सफरचंदाच्या गोष्टीतही येतो. 

बहुतांश वेळेला साप त्याला डिवचल्या शिवाय कोणालाही चावत नाही. आणि जर कोणी कारण नसताना त्याच्या वाटेला गेलं तर सोडतही नाही.. आणि म्हणूनच त्याला इगो चं  प्रतीक मानलं  गेलंय.. जोवर तुमचा इगो स्वच्छ सरळ असतो तोवर तो तुमच्यासाठी खूप चांगला ठरतो, पण जरा त्याची वाट वाकडी झाली कि तुम्ही संपलात म्हणून समजा!


सापांचं इकोसिस्टिम मधलं, अन्नसाखळी मधलं, शेती मधलं महत्व वादातीत आहे. तो खूप मार्गानी आपल्यासाठी उपकारक ठरतो, उगाच त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलेलं नाहीये. आपल्या धर्मात तर त्याला देवच गणलं  गेलंय.. इतकं  असूनही 'दिसला साप की  मारा' हे तत्व काही कोणी सोडत नाही. एकीकडे मंदिरांमध्ये त्याला हळदी-कुंकू वाहायचं , नागपंचमीला त्याची पूजा करायची आणि दुसरीकडे त्याला जीवानिशी मारायचं हा आपल्या समाजातला खूप मोठा विरोधाभास आहे. बहुतांश वेळा हे भीतीपोटी केलं जातं पण काहीही असलं  तरी ते चूकच आहे. 
आणखी एक विरोधाभास म्हणजे, नागपंचमीला नागांना दूध पाजणं! साप कधीही दूध पीत  नाहीत. खरंतर ते त्यांच्यासाठी विषारीही ठरु शकतं.. पण डोळ्यांवर झापडं बांधलेले आपण हे सर्रास करतो. पुराणांमध्येही सापांना  दूध पाजा असं  कुठेही सांगितलेलं नाही. दुधाने अंघोळ घालावी असे उल्लेख मात्र सापडतात. खरंतर त्याचीही आवश्यकता नाही. त्याऐवजी आपण, 'बाबा रे, जर कधी तू आमच्या दृष्टीस पडलास तर आम्ही तुला कधीही मारणार नाही, सर्पमित्रां करवी तुला तुझ्या सुरक्षित स्थळी पोचतं  करू' असं वचन त्याला देऊ शकलो तर ती सुद्धा त्याची खूप मोठी पूजाच  ठरेल!

तर थोडं डोळसपणे याकडे पाहत आपण ही नागपंचमी आनंदाने साजरी करूया आणि आपली सुंदर संस्कृती जतन करुया. 
काही महिन्यांपूर्वी मी माझ्या भाचीच्या एका कॉम्पिटिशन साठी सापांवर आधारित एक rhyme बनवली होती, ती खाली देतेय.. पहा आवडतेय का!
सर्वांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा!

Hey friends, sheshnaga 

is my name

The king of snakes 

as they claim

I hv thousand heads, 

all so same


Long long ago I used to be 

lord Vishnu’s bed

Then on I became an umbrella 

To save little krishna, 

from the rain


Vasuki became a rope and

churned the ocean 

Now tell me friends, without me 

was samudra manthana possible?


I love eating rats

They are like delicious snacks

Thus I help the farmers and 

Protect their crops


Don’t get afraid oh my dear friends

All the serpents are not the same

Few are poisonous, rest are safe


But be aware about 

the poisonous ones,

all poisons are not deadly 

but some can be dangerous 


If u see a snake in your yards

Call a snake friend and just relax

Killing a snake is not so good

Should we hurt a friend who’s so helpful?



- संजीवनी 


FOLLOW ME ON INSTAGRAM
I'm on Instagram as chafa_6. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=zqec9nr3tat0&utm_content=h8a8d6b

FOLLOW ME ON FACEBOOK
https://www.facebook.com/चाफा-103572864728812/



टिप्पण्या

अनामित म्हणाले…
कविता छानच आहे. माझया भाची ला शिकवील.

लोकप्रिय पोस्ट