हॅप्पी पिरियड्स!!
समोरच्या स्क्रीनवरच्या विंडोवर झळकत होतं. पण कन्फर्म करायला हात
काही पुढे होत नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत मनाची तयारी नव्हती. या आधी
प्रॉडक्ट सर्च करून हो-नाही करण्यातच
महिना घालवला होता, त्यानंतर महिनाभर तो तसाच बास्केट मध्ये पडून होता. पण कसंतरी धाडस करून
त्यादिवशी मी ‘प्लेस ऑर्डर’ पर्यन्त
पोचले होते. आणि शेवटी आता मागे हटायचं नाही, पाहुच काय
प्रकार आहे, नाहीतरी असाही त्रास होतोच आहे असं म्हणून क्लिक
केलं आणि अशा तर्हेने माझ्या पहिल्या-वहिल्या मेन्स्ट्रूअल कप ची ऑर्डर प्लेस
झाली..
खरतर खूप पूर्वीच त्याविषयी वाचलं होतं पण ती कल्पना काही रुचली
नव्हती. म्हणजे मेंदूला पटायचं पण ‘ईई.. नको रे बाबा तसलं काही’ असं वाटायचं. पण नंतर
नंतर सॅनिटरी पॅड चे साइड एफ्फेक्ट्स जाणवू लागले. त्रास ही पूर्वीपेक्षा वाढला
होता. मग एकदा पाहुतरी काय प्रकार आहे म्हणून त्याविषयी पुन्हा सर्च केलं..
यूट्यूब वर भरपूर व्हीडिओज पण पाहिले आणि सगळीकडे ‘इट्स ए
ब्लेसिंग फॉर विमेन’, ‘एकदा वापरलं तर
तुम्ही याच्या प्रेमात पडाल’ वगैरे वगैरे वर्णनं ऐकली.
मेंदूला सगळं पटत होतं, पण ते ‘एकदा’ वापरणच खूप मोठं आव्हान वाटत होतं. एकतर आधीच आपल्याकडे मासिक पाळी या
विषयाबाबत अजूनही केवळ कुजबूज चं केली जाते. उघडपणे काही बोलणं वगैरे वर्ज्य समजलं
जातं. तो एक टॅबू आहे. पण सततचा त्रास, रॅशेस, लहान बाळ त्यात वर प्रचंड मूड स्विंग्स या सगळ्यामुळे महिन्याचे ते दिवस
जीवघेणे वाटू लागले होते. मग शेवटी नाईलाजाने म्हणून मी मेंस्ट्रूअल कपचा विचार
करायला लागले.
‘ईकोफ्रेंडली पिरीयड्स’, ‘हर रेड फ्लॉवर गोइंग ग्रीन’
वगैरे फ्रेजेस पाश्चिमात्य देशांमध्ये आता नवीन राहिलेल्या नाहीत.
आपल्याकडे सुद्धा केरळ मधलं मुहम्मा हे गाव देशातलं पहिलं ‘सिन्थेटिक
पॅड फ्री’ गाव होण्याच्या मार्गावर आहे! पण याचा अर्थ काय? कोणी म्हणेल आत्ता आत्ता पर्यन्त तर पॅड वापरा असं थेट अक्षय कुमार पासून
सगळे सांगतायत, टिव्ही वर दर दहा पैकी एक जाहिरात ही सॅनिटरी
पॅडचीच असते.. तर मग हे पॅड फ्री अजून काय आहे? तर ते काय
आहे हे जाणून घेण्या आधी आपण सॅनिटरी पॅड वेस्ट ही किती गंभीर समस्या आहे हे समजून
घेऊ. एक महिला तिच्या एका सायकल मध्ये किमान 8 पॅड वापरते असं धरून चाललं तर जगात
एका वर्षात 12.3 बिलियन सॅनिटरी पॅड वापरले जातात. आणि तेवढा वेस्ट तयार होतो. जो
डिसपोज करणं ही पूर्ण जगासमोरची अतिशय गंभीर समस्या आहे. पॅड आणि टेम्पोन मध्ये जे
प्लॅस्टिक वापरलं जातं ते पुर्णपणे डिसपोज व्हायला 500 वर्ष लागतात! कल्पना करा
आपण किती मोठ्या समस्येला निमंत्रण देतोय! मागच्या वर्षी केरळ मधल्या मुहम्मा
गावाजवळचा कॅनल ब्लॉक झाला म्हणून तो साफ करताना लोकांच्या लक्षात आलं की अतिशय
मोठ्या प्रमाणात पॅड आणि डायपर साठल्यामुळे तो ब्लॉक झाला होता. आणि तोच कॅनल पुढे
जाऊन मिळत होता जगप्रसिद्ध वेंबनाड लेक मध्ये! या भयानक परिस्थितीचा अंदाज येऊन
अशोका ट्रस्ट फॉर रीसर्च इन ईकोलोजी अँड एंव्हायर्न्मेन्ट (ATREE) या सेवाभावी संस्थेने हा प्रश्न मुळासकट संपवायचा चंग बांधला आणि मुहम्मा
ग्रामपंचायतीच्या सहयोगाने गाव सॅनिटरी पॅड फ्री करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आज
त्या गावात जवळ-जवळ 700 महिला ज्या अतिशय अल्प शिकलेल्या आहेत त्या अतिशय आनंदाने
मेंस्ट्रूअल कप वापरतायत.
2-3 दिवसातच मला फोन वर मेसेज आला, ‘तुमची ऑर्डर आज डिलिव्हर होइल’. आणि पुन्हा भीती वाटायला लागली. उगाच ऑर्डर केला का, आपल्याला जमेल का, आणि नाही जमलं तर?, पैसे वाया गेले तर? भरपूर प्रश्न डोक्यात गोळा होऊ लागलेले
होते. दुपारी दाराची बेल वाजली आणि माझा तो मेंस्ट्रूअल कप माझ्या हातात पडला. आधी
त्याला निरखून पाहिलं. हे एवढं आत कसं काय जाणार वाटू लागलं. पण मी घेतानाच बिगिनर
फ्रेंडली ‘Gaaia’ ब्रॅंड चा कप घेतला होता. तो कप बर्यापैकी फ्लेक्सिबल
आहे. पिरीयड्स डोळ्यासमोर ठेवूनच ऑर्डर केलेला असल्यामुळे, तो
मिळाल्यावर एक-दोन दिवसातच माझे पिरीयड्स आले. आणि मी तो वापरायला घेतला. मेंस्ट्रूअल
कप्स हे सिलिकॉन पासून बनवलेले असतात. ते अतिशय फ्लेक्सिबल असतात. आणि योग्य पद्धतीने
फोल्ड केल्यावर कप व्यवस्थित योंनीतून आत जातो. आत गेल्यावर त्याचा फोल्ड ओपन होतो.
आणि त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या चार छोट्या छिद्रांमुळे air suction होऊन तो तिथे अगदी फिट बसतो. आणि आपली योनि
लॉक होते. आणि सगळा स्त्राव त्यात जमा होतो. बाहेर काहीही येत नाही. आणि तो एकदा का
आत नीट बसला की आपल्याला जाणवतही नाही आपल्या आत काहीतरी आहे असं. पिरीयड्स चालू आहेत
हेही आपण विसरून जातो.
हे सगळं मी यूट्यूब टुटोरियल्स मध्ये पाहिलेलं होतं. पण प्रत्यक्ष
प्रयोग करताना मात्र भीती वाटतच होती. पण मनाचा हिय्या केला आणि seven
fold पद्धतीने त्याला फोल्ड केलं आणि आत इन्सर्ट केलं, मी कल्पना केली होती की खूप दुखेल, त्रास होईल.. पण
अजिबात नाही! मला काहीही झालं नाही. कप स्मूथली आत जाऊन ओपन झाला. आणि जादू!! मी विसरून
गेले मी माझे पिरीयड्स चालू आहेत. सारखं सारखं पॅड जागेवर आहे नं हे पाहत राहणं, हेवी फ्लो असला की कधी कधी स्पॉटिंग होणं, जीवघेणे रॅशेस सहन करणं आणि वर त्याच्या डिसपोजल चे प्रश्न.. हे सारं काही एका क्षणात जादू व्हावी
तसं नाहीसं झालं होतं! एकदा कप इन्सर्ट केला की 8-9 तास पहायचीही गरज उरत नाही. हेवी
फ्लो असताना तेव्हढं 6 तासांनी तो काढावा. पहिले एक-दोन पिरीयड्स काढताना-घालताना थोडा
त्रास होऊ शकतो पण एकदा का सवय झाली की मग ते अगदी पाच मिंटांच काम होऊन जातं. काढताना
जनरली potty flex (बाळंतपणाच्या वेळी जो
पुश फोर्स आपण वापरतो तो) त्याचा वापर करावा म्हणजे त्याला काढणं सोपं जातं. याचीही
ट्यूटोरियल्स यूट्यूब वर अव्हेलेबल आहेत. बाहेर काढलं की त्याला धुवून गरम पाण्यात
पाच मिनिटं स्टरलाइज केलं की झालं, तो पुन्हा वापरण्यासाठी तयार!
एक कप आपण 20-20 वर्षही आरामात वापरू शकतो. त्रास नाही, पॅड चेंज
करत राहण्याची झिगझिग नाही, आणि वर ईकोफ्रेंडली.. झीरो वेस्ट!!
मेंस्ट्रूअल कप्स हे खरच स्त्रियांसाठी वरदान आहेत. आणि मी हे
स्वत:च्या अनुभवा वरुन सांगतेय. फक्त सुरूवातीला थोडसं धाडस दाखवण्याची गरज आहे! आता
काही जणींना प्रश्न पडतो, मग शी-शू चं कसं? बर्याच जणींना माहीत नसतं की योनि आणि urine होल हे
वेगवेगळे असतात. त्यामुळे आत असलेल्या कप चा या कशावरही काहीही परिणाम होत नाही, सगळं अगदी सुरळीत राहतं. आणि suction नीट बसलेलं असलं
की कप कितीही फोर्स लावला तरी बाहेर येत नाही. तो त्याच्या योग्य technique नेच बाहेर काढावा लागतो. त्यामुळे तो बाहेर आला तर काय वगैरे काळजी करण्याचीही काही गरज नाही.
मेंस्ट्रूअल कप्स ही खरच काळाची गरज आहे. आणि ते स्त्रियांच्या आरोग्याच्या
दृष्टीनेही सेफ आहेत. डॉक्टर स्वत: ते रेकमेंड करतात. सॅनिटरी पॅड किंवा टेम्पोन्स
मध्ये तर्हेतर्हेची रसायनं वापरुन ब्लडला जेल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ते तसेच
5-6 तास आपल्या शरीराला चिकटून असतात. याने कॅन्सर चं प्रमाणही खूप वाढतय. शिवाय खुपवेळा ते
नीट डिस्पोज पण केले जात नाहीत. आपल्या आजूबाजूला रस्त्यावर, उघड्या जागी असे पडलेले पॅड आपण
खुपवेळा पाहतो. आणि डोळे बंद करून घेतो. पण एक खूप महत्वाचा प्रश्न आपण स्वत:ला विचारण गरजेचं आहे, आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सॅनिटरी वेस्टचा ढीग
मागे सोडून जाणार आहोत का? थोडी दूरदृष्टी वापरुन, आपले टॅबूज काही काळासाठी बाजूला ठेवून आपण सर्वांनी, आपल्या शरीरावर प्रेम करत हा बदल स्वीकारणं ही काळाची गरज आहे.. हे सोपं आहे
असा अजिबात म्हणायचं नाही मला. कप वापरण्यात सगळ्यात मोठी अडचण कुठली असेल तर ती म्हणजे
आपल्या मनाची तयारी यासाठी लवकर होत नाही ही! पण त्यावर मात करत थोडसं धाडस आपण दाखवलं
तर माझ्या बाबतीत जी जादू घडली ती तुमच्याहि बाबतीत नक्कीच घडेल.. Happy Periods To All the Beautiful Ladies out there 😊
मी जो मेन्स्ट्रुअल कप वापरला त्याची लिंक खाली देतेय, नक्की पहा.. या विषयाचा अभ्यास करा आणि Let Your Red Flower Go Green!!
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
.... This is really very much new for me... Will definitely think about it
Definitely go for it without a second thought.. you will love it.
Glad to here about your experience..
These cups are truly a blessing fr women!
Plz reply..mi agdich beginner aahe aani aai chi Mahat prayatnanni sahmati milvun magavtey
What’s your age bdw?
https://youtu.be/tgXpWtGFbwE
Mzha experience ithe sangen ..azun yaychay cup actually