हे चांदणे फुलले कसे..
हे चांदणे फुलले कसे
अन् रंग हे उधळले कुणी
त्या तारका गेल्या कुठे
रात्रीस ज्या उजळल्या इथे
हा सूर्य कसा केशरला
आभाळ कसे सजले असे
कुठली ही पाखरे
पहुडली आज कौलांत इथे
कुणाचे हे सूर, जात्यांत
ओव्या विणतात इथे
कोणत्या अन् श्रमांनी
तृणांत फुले फुलतात तिथे
शांत सुरेख पहाट ही
कुणी पसरली अंगणात अशी
कसली ही अवीट ऊर्मी
विझुन स्फुरतात मनात गीते
न माझे न हे तुझे
हरणे आणिक जिंकणे
रात्रीनंतर पहाट सांग,
उगवल्यावाचून राहतेच कुठे..!
~ संजीवनी
टिप्पण्या