शब्द
क्षीर-जळातुन वेचलेले,
शब्द कोवळे
क्षीर-तळाशी साचलेले
मोती पोवळे
ह्रदय तीरी तरंगणारे
रंग निळे
ह्रदय सुरांशी सांगणारे
नाते सावळे
देवराईच्या जर्द वनातले न
देव सोवळे
देवराईतच कुंद व्याकुळ ते
गंध सोहळे
दूर माळावर तहानलेले
विहग तळे
दूर माळाच्या गर्भात, गोठलेली
थेंब जळे
शब्द अभावित जसे, तरुंवर
चंद्र निथळे
शब्द अभावित तसे, जळावर
सांज ढळे
~ संजीवनी
टिप्पण्या