दिगंत : भाग-१
“काय? एक एक
मिनिट. राजेश तू असं ऐनवेळी नाही सांगू शकत मला प्रेझेंटेशन इंकम्प्लिट आहे
म्हणून!! केलस काय तू काल दिवसभर? आज
शार्प 11 ला मीटिंग आहे. तुला
माहितीये हे..
.. वेट वेट, मला
एक्सक्युजेस नकोयत. काय कसं
ते तू बघ. वीदिन अॅन अवर मला मेल आला पाहिजे! दॅट्स इट.”
गडबडीत एका हाताने ट्राऊजर ला इस्त्री करत, दुसर्या हाताने ओम्लेट चा
रोल घशाखाली उतरवत, स्पीकर ऑन असलेल्या फोन वरून संहिता
राजेश वर अक्षरश: खेकसत होती. तो कॉल कट केला न केला की लगेच वर्मा चा कॉल तिच्या
फोन वर झळकला. वर्मा म्हणजे तिचा बॉस! कपाळावरच्या आठ्या मिटवत, श्वास एकसारखा करत तिने तो रिसिव्ह केला. पलिकडून इंक्वायरी सुरू झाली.
“सो संहिता, यॉर टीम इज रेडी फॉर टूडे’ज प्रेझेंटेशन? सी धिस क्लाईंट इज वेरी हाय प्रोफाइल अँड वेरी इम्पॉर्टंट अॅज वेल. वी
नीड एव्रिथिंग अप टू द मार्क. गॉट इट!”
“येस सर. आय नो. आय अॅम पर्सनली लूकिंग इंटू एव्रिथिंग..” सगळं
ठीक असल्याचा आव आणत ती उत्तरली.
“गुड.. प्रेझेंटेशन तू स्वत: दे. आणि लेट मी क्रॉस चेक इट
फर्स्ट.” वर्मा.
आता जास्त टेपा लाऊन उपयोग नाही हे संहिताला कळून चुकलं. ती
म्हणाली,
“सर, अॅक्चुअल्ली.. प्रेझेंटेशन वर अजून काम चालूये. झालं की मी रीपोर्ट करेनच
तुम्हाला.”
“काम चालूये म्हणजे? इट्स एट थर्टी ऑलरेडी संहिता! आर यू आऊट ऑफ यॉर माइंड?” वर्मा भडकला होता.
यावर शक्य तितक्या शांतपणे ती म्हणाली,
“सॉरी सर, पण राजेश आणि सोहम
प्रेझेंटेशन वर काम करत होते. सोहम ची आई अचानक आजारी पडली म्हणून तो लीव वर आहे.
राजेश एकट्याने मॅनेज करतो म्हणाला होता. कालपर्यंत एव्रिथिंग वॉज ऑन लाइन. रात्री
मला प्रेझेंटेशन मिळणं अपेक्षित होतं. पण ते नाही मिळालं. व्हेन आय आस्क्ड फॉर, राजेश म्हणाला ते अजून रेडी नाहीये. ही इज स्टिल वर्किंग ऑन इट.. बट, यू डोन्ट वरी सर. आय विल मॅनेज थिंग्ज वीदिन टाइम.”
“आर यू सिरियस संहिता?? व्हेर इज यॉर प्रोफेशनलिज्म? यू कांट ईवन मॅनेज यॉर
टीम अँड डेडलाइन्स! तरीच मला हा प्रोजेक्ट तुला द्यायचा नव्हता. पण हे सिनियर्स!! काय
माहित या आधीचे प्रोजेक्टस नक्की कसे मिळवलेयस तू.. एनिवेज सी मी अॅट द ऑफिस.
नाऊ!”
‘कसे’ वर छद्मी हसून वर्मा ने पलिकडून फोन कट केला.
संहिता क्षणभरासाठी स्तब्ध झाली! तिच्या कानांवर आत्ता जे काही
पडलं होतं ते केवळ अविश्वसनीय होतं. वर्माच्या बोलण्यात तितकंसं तथ्य नसतं हे
माहित असलं तरी आज तिला जे ऐकावं लागलं होतं ते किळसवाणं होतं.
बर्याच वेळाने वाजणार्या फोनच्या आवाजाने ती भानावर आली. तिने
इकडे-तिकडे पाहिलं. पण फोन तिचा नव्हता. रियाचा फोन वाजत होता. ‘ही मुलगी ना..’ मनातल्या मनात म्हणत जराशा वैतागातच ती हॉल मध्ये आली. अस्ताव्यस्त
पसरलेली पुस्तकं, कॉफीचे मग्स, चालू
असलेला टीव्ही, समोरच्या टी-पोय वर वाजत असलेला फोन आणि
सोफ्यावर आडवी पडून केसाच्या बटेसोबत निर्विकारपणे खेळत बसलेल्या रिया कडे पाहून
ती क्षणभर थांबली.
“रिया..”
शून्य प्रतिसाद!
“रिया?? अगं फोन वाजतोय तुझा..”
रिया ने क्षणभर फोन कडे पाहिलं आणि मग मान वाकडी करून संहिता कडे पाहिलं..
आणि मग बोट टीव्ही च्या दिशेने रोखलं.
हेडलाइन झळकत होती,
“केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर. अमुक अमुक देशात पहिला..
वगैरे वगैरे..”
संहिता क्षणभरासाठी एकदम excite झाली. आनंदाने किंचाळत ती म्हणाली,
“रियू.. म्हणजे तू..”
आणि मग रियाच्या नकारर्थी डोलणार्या मानेकडे पाहून एकदम गप्प
झाली. तिला काही सुचलंच नाही. इंटरव्ह्यु बरा गेलाय हे ऐकल्यापासून यावर्षीच्या
फायनल लिस्ट मध्ये रिया असणारच हे ती गृहीत धरून चालली होती. पण घडलं उलटच होतं..
दोघीही काही मिनिटं तशाच शांत बसून राहिल्या. शाब्दिक सांत्वन
वगैरेची गरज नसलेली ती परिस्थिती होती आणि त्यांचं नातंही. काही मिनिटांनी रियाने
उठून रिमोटची बोटांना सापडतील ती बटणं दाबली. बातम्यांचा आवाज जाऊन welcome to the world of travel असं काहीतरी कानांवर पडल्यावर ती शांत झाली.
आणि पुन्हा बसून राहिली नुसतीच.
एव्हाना संहिताचा फोन पुन्हा वाजायला लागला होता. चिडून तिने तो
आधी सायलंट केला पण मग क्षणभराने काहीतरी विचार केल्यासारखा स्विच ऑफच करून टाकला.
दोघी काहीही न बोलता डोक्यात चालू असलेल्या वादळांवर हिंदकळत
होत्या.
काहीवेळाने खिडकी बाहेर पाहत संहिता बोलू लागली,
“यू नो व्हॉट, या कंपनीत मी आता जवळ-जवळ तीन वर्षांपासून काम करतेय! पण माझ्याकडे
अजूनही एम्प्लोयी म्हणून नाही तर ‘फिमेल’ एम्प्लोयी म्हणूनच पाहिलं जातंय. नो मॅटर हाऊ हार्ड आय वर्क ऑर हाऊ इफीशियंट्ली
आय मॅनेज माय क्लाएंट्स!” ती आतून अक्षरश: चडफडत होती.
रियाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.
“माझं सक्सेस असो अथवा फेल्यर.. पहिल्यांदा चर्चा कशाची होते तर
माझ्या ‘फिमेल’ असण्याची.. पाथेटिक मोरोन्स..” अवळलेली मूठ तिने सोफ्यावर आपटली.
रियाने सहानुभूतीने तिच्या पाठीवरून हात फिरवला. आणि एक मोठा श्वास
घेऊन ती काहीतरी बोलणार इतक्यात पुन्हा तिचा फोन वाजू लागला. आईचा असल्याने तिने तो
उचलला. थोडं सांत्वनपर बोलणं वगैरे झाल्यावर रियाची आई मुद्द्यावर आली.
“बरं रियू, अॅज यू प्रोमिस्ड अर्लियर, आता आपण मुलं बघूया का..”
“आई, अगं पण..” रिया काही बोलणार इतक्यात तिला मध्येच तोडत तिची आई पुढे म्हणाली..
“पण वगैरे नको रियू आता.. ते राव काका त्यांच्या अनुराग साठी कधीपासून
विचारतायत. एकदा भेट तरी तू.. लगेच कै होणार नाहीये लग्न. बरा वाटला तर पुढचा विचार
करू.. मी नंबर दिलाय तुझा त्यांना. तो करेल तुला फोन.”
“आई हे बघ, बर्या-वाईटाचा प्रश्न नाहीये. अगं आज रिजल्ट लागलाय.. थोडं थांब की. पाहू
आपण नंतर. आणि मी पुढचा अटेम्प्ट.. हॅलो.. हॅलो आई..”
पलिकडून फोन केव्हाच कट झाला होता. रिया अजूनच वैतागली. तिने फोन सोफ्यावर
आदळला.
संहिता तिच्याकडे पाहतच होती.
तिच्याकडे पाहत रिया वैतागून म्हणाली,
“कुठेतरी निघून जावसं वाटतय यार मला.. दूर..”
“लेट्स गो टू हम्पी.. अँड एक्सप्लोर इट्स अॅन्शिएंट ट्रेझर!”
चालू असलेल्या टीव्ही वरचं वाक्य दोघींच्या कानांवर पडलं.
दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. ती नजर वेगळी होती.
काहीतरी विचार केल्यासारखी जमिनीकडे पाहत संहिता म्हणाली,
“चल.. जायचं खरंच?”
रियाने क्षणभर अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं.
पण, मनात रिझल्ट, आई, लग्न, मुलं.. वगैरे विचार दाटायला लागल्यावर तीही निश्चय झाल्यासारखी म्हणाली,
“चल..”
दोघींनी मग मागचा पुढचा विचार न करता लगेच थोडे कपडे, थोडं सामान sack मध्ये कोंबलं. आणि जायला निघाल्या.
रियाने गूगल मॅप ऑन केला आणि संहिता ने गाडी स्टार्ट केली..
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
pudhacha bhag kadhi ?
lavkarch..
कारण बरेच दा मी सुद्धा अश्या रोड ट्रिप्स माझ्या दिवास्वप्न मध्ये कल्पना केल्या आहेत.. फक्त ते दिवास्वप्न लगेच प्रत्यक्षात येण्याची शक्यता लगेच तरी नाहीय पण तरी सुद्धा...
स्वप्न पाहायला कुठ पैसे पडतात!!😂
जोक्स अपार्ट...
पण ही कथा खरचं माझ्यासाठी आय opener होती...
म्हणजे मला पण माझ्या प्रॉब्लेम्स पासून एस्कॅप हवाय पण अनुराग च बोललं पण पटलं...
प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी जेवढं बळ लागत तेवढंच बळ प्रवाहासोबत जाण्यासाठी पण लागत हे आता जाणवलं मला ही कथा वाचल्यानंतर!!
काय बोलू काही सुचत नाहीय...
Go with the flow ही पण जगण्याची बेस्ट स्ट्रेटर्जी असू शकते हे कळण, जाणवान, ही फिलिंग च भारी आहे..
मला माझ्या स्वप्नासाठी प्रवाहाविरुद्ध जावं लागतंय... म्हणजे काय जगावेगळी कसरत करावी लागतीय असं नाहीय... पण ...
मला go with the flow ही लक्झरी पण नाहीय!!
का, कसं, अस का, असे काय प्रॉब्लेम आहेत!!!
जस्ट they aren't much important...
पण ही कथा माझ्यासाठी बुस्ट ठरली आहे...
प्रत्येक वेळी झगडण्यापेक्षा, प्रवाहसोबत पण जाता येते... it's okay to go with the flow....
एवढी सुंदर कथा देण्यासाठी खरचं खूप धन्यवाद....
पुढचा प्रवास, आता प्रवास यासाठी की कथेची सुरवात प्रवासान झाली ना म्हणून... पुढचा या कथेचा प्रवास वाचायला नक्की आवडेल....
मी ही कमेंट 16th पार्ट वर माय बोली वर upload करायचा खूप try केला तरी काय तर प्रॉब्लेम येत होता सो ही कॉमेंट इथ 1स्त पार्ट वर upload krtiy