इंजीनीरिंगच्या नावानं चांगभलं.. (१२)





 

So girls, now you are entering a whole new ‘electrical world’!

इलेक्ट्रिकल चा पहिलाच तास होता. आणि त्या मख्ख प्रोफेसरीण बाई शक्य तितक्या मख्ख आवाजात वरील वाक्याच्या अर्थाच्या अगदी विरुद्ध सुरांत आपल्या विषयाची ओळख करून देत होत्या. संपी, मीनल सोबत भिंतीजवळच्या बेंच वर बसलेली होती. तिचं लक्ष प्रोफेसरणीकडे. मीनल तिला नज करून नवीन घेतलेल्या रजिस्टर वरची covers दाखवत होती. त्यांची चुळबुळ पाहून त्या प्रोफेसर बाईंनी,

हे, यू स्टँड अप..असं म्हटलं.

संपी आणि मीनल एकमेकींकडे पाहू लागल्या. त्या बाई पुन्हा म्हणाल्या,

यस यस.. यू, गर्ल इन पिंक पंजाबी सूट..

संपीला नाईलाजाने उठावं लागलं.

व्हाट्स यॉर नेम?’

तोंडात आलेलं संपीपरतवत संपी म्हणाली,

संपदा जोशी

सो, संपदा, व्हॉट डू यू मीन बाय electricity?’

आता electricity म्हणजे काय हे इंजीनीरिंगला असलेल्या स्टुडेंटला माहिती नसेल का? संपीला अर्थातच माहिती होतं. पण असं अचानक सगळ्या वर्गाची नजर आपल्यावर खिळलेली असताना नेमके  शब्द फितूर होतात. संपीचंही तेच झालं. पण मग काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे या जाणीवेतून मेंदूत शब्दांची जुळवाजुळव व्हायच्या आधीच ती उत्तरली,

‘electricity means.. hmm.. hmm.. light..’

(घरी वीज आली-गेली की आपण नाही का म्हणत लाइट आली किंवा गेली तसं :D )

या उत्तराबरोबर प्रोफेसरीणबाईच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि पूर्ण वर्गात हशा पिकला.

संपीचं ध्यान मात्र नेहमी सारखं गोंधळलेलं.

बाईंनी मग पे एटेन्शनम्हणत संपीला नजरेनेच खाली बसायला सांगितलं. सगळ्याजणी संपीकडे पाहून हसत होत्या. संपीनेही मग त्यांच्यासोबत भरपूर हसून घेतलं.

 

थोड्याफार फरकाने सगळी lectures अशीच पार पडत होती. सुरूवातीला असतो तसा सीरियसनेस यही वेळेस संपीमध्ये संचारला होता. पहिल्या वर्षी सगळ्या ब्रांचेसची तोंडओळख करून देणारे विषय अभ्यासाला असतात हे आता संपीला कळलं होतं. शिवाय सोबत मॅथ्स, अप्लाइड फिज़िक्स, अप्लाइड केमिस्ट्रि इ.इ. आलेच. फिजिक्स आणि केमिस्ट्रि अप्लाइडअसू शकतात याची जाणीव संपीला आत्ताच झाली. अकरावी-बारावीत ते फक्त एमसीक्यू सोडवण्यापुरते किंवा सीईटी पास करण्यापुरते असतात असाच तिचं समज झालेला. लायब्ररी मध्ये जाऊन तिथली पुस्तकंही आता संपी चाळायला लागली होती. तिथले ते मोठे मोठे संदर्भ ग्रंथ पाहून तिचे डोळे पांढरे व्हायचे.. पण तिच्या त्या टॉपकरायच्या निग्रहापुढे तिने त्यांची परवा केली नाही.

काही दिवसांनी संपीच्या अंगावरचा पंजाबी सूट जाऊन तिथे कॉलेजचा शर्ट-ट्राऊजर-टायअसा युनिफॉर्म आला! संपीचं रुपडच पालटलं. आजपर्यंत कधी साधी जीन्सपण न घातलेल्या तिला हा युनिफॉर्म फारच भारी वगैरे वाटायला लागला. शिऊन आला त्यादिवशी तर बराच वेळ तो घालून तिचं आरशात पाहणं चालू होतं.

मीनल सोबत तिचं ओर्कुटायनही आता जोरात सुरू होतं. पूर्वीचे सगळे वर्गमित्र-मैत्रिणी या ऑर्कूटच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. ग्रुप्स बनले. इतकी वर्ष सोबत राहून कधी समोरा-समोर न बोललेले हे सगळे आता ऑर्कूट वर मात्र गुलूगुलू बोलायला लागले होते. एकमेकांच्या मध्ये असलेलं ते आभासी माध्यम त्यांना सोयीचं वाटत असावं.

अवचट चा आता मंदार झाला होता. आणि संपी ची संपदा. मंदार आणि संपी आता बर्‍यापैकी बोलायलालागले होते. हा मंदार आपल्याला ओळखतवगैरे असेल याची इतकी वर्षं वर्गात खाली मान घालून काढलेल्या संपीला त्याचा srap येईपर्यन्त कल्पनाच नव्हती. पण तोच काय, वर्गातली इतरही बरीच मुलं संपीशी छान बोलायला लागली होती. आणि अरेच्चा आपण इतकेही बावळट नाही आहोतयाची जाणीव संपीला झाली. मुलांना ती इतरांपेक्षा वेगळी वाटायची कारण तिच्या वागण्यात एक प्रकारचा निखळपणा होता.

दिवस जाऊ लागले तसा या नवीन कॉलेजमध्येही आता संपीचा एक ग्रुप तयार झाला. ती, मीनल, प्राजक्ता आणि प्रॉपर पुण्यातलीच असलेली मेघा. चौघी सगळीकडे एकत्र. संपी रोज तिच्या ऑर्कूट वरच्या घडामोडी ग्रुपमध्ये सांगायची. त्यामुळे, श्रावणी, किशोर, मंदार, श्रीनिवास इ.इ. डझनभर तरी नावं आता ती सोडून इतर तिघिंचीही पाठ झालेली होती. आणि त्यांचे किस्सेही.

मंदारचा उल्लेख थोडा जास्त असायचा. आधी इंजीनीरिंगशी निगडीत असलेल्या त्यांच्या गप्पा, सध्याचं कॉलेज, मित्र-मैत्रिणी, अभ्यास अशा मार्गाने जात जात पूर्वीच्या आठवणींवर कधी येऊन पोचल्या त्यांचं त्यांनाही कळलेल नव्हतं. काही झालं तरी ऑर्कूटवर बोलण्याला मर्यादा होत्या. कॉलेजमध्ये आल्यावरचं, त्यातही लॅब असिस्टंटला चुकवून नाहीतर मग बाहेरच्या सायबर कॅफे मध्ये वगैरे ऑर्कूट उघडता यायचं. त्यावेळी इंटरनेट अॅक्सेस इतका सहज नव्हता. मोबाइल फोनही अगदी साधे, मन्युयल कीपॅड असलेले होते.

संपीच्या जगात आता आभासी माध्यमातून जरि मुलांचा प्रवेश झालेला असला तरी समोर मुलं दिसल्यावर मात्र अजूनही तिची घाबरगुंडी उडतच होती. तिचं कॉलेजही गर्ल्स असल्यामुळे तिचं तसा मुलांशी फारसा संबंध यायचा नाही. पण कॅम्पस मध्ये इतरही कॉलेजेस असल्यामुळे मुलांचा वावर हा होताच.

एका दिवशी कॅम्पस मधल्या एकमेव झेरॉक्स सेंटरवर संपी कशाचेतरी झेरॉक्स काढण्यासाठी आली होती. पण तिथे काऊंटर वर मुलांची ही गर्दी. संपी एका कोपर्‍यात तिष्ठत कितीतरी वेळ उभी. त्यांच्यात घुसून, किंवा त्यांना सरका म्हणून आपलं काम करून घेण्याचं धाडस तिच्याच्याने होईचना. बराचवेळ झाला संपी परतलीच नाही म्हणून मीनल तिच्यामागे तिथे आली आणि संपीला असं कोपर्‍यात उभी पाहून तिने कपाळालाच हात लावला. तिने तिच्या हातातल्या नोट्स घेतल्या आणि एक्सक्यूज मी..म्हणत वाट काढत थेट जाऊन काऊंटर वर धडकली. संपी तिच्याकडे पाहतच राहिली. मीनल ने मग भय्या, इतना दो ना पेहले, मेरा लेक्चर है.. भय्या प्लीज..म्हणत गोड-गोड बोलून तेवढ्या गर्दीत त्या झेरॉक्स वाल्या भय्याकडून आपलं कामही करून घेतलं. आणि तो गठ्ठा संपीच्या हातात सोपवत म्हणाली,

देखा, ऐसे करना पडता है.. और तू.. कबसे खडी है हात बंधे हुये..

अगं मला भीती वाटते बाबा बोलण्याची..संपी म्हणाली.

क्युं? खा जाएंगे तुझे लड्के? संपे ढीट बन जा अब तू.. ये बॉइज फोबिया कुछ काम नई आनेवाला तेरे

हम्म.. बॉइज फोबिया.. खरंय..

संपी मीनल कडे पाहून खुद्कन हसली आणि मनातल्या मनात विचारातही पडली.

 

 

क्रमश:

 

संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट