पाचगणी.. (संपी आणि तिचं धमाल जग : भाग ३४)

 



मेचं उन्ह डोक्यावर चढायला लागलं होतं. पण परिसर आल्हाददायक असल्याने संपदा आणि राधा दोघींना ते जाणवलं नाही. साधारण दुपारच्या आसपास त्या पाचगणीला पोचल्या. सृष्टी सोनेरी रंगात नाहत होती. आता काहीच दिवसात येऊन पोचणार्‍या पावसाने ही सोनेरी कळा जाऊन तिच्यावर हिरवा शालू चढणार होता. आपापली sacks सांभाळत दोघी गाडीतून उतरल्या. त्यांचा असिस्टेंट रवीन आज काही कारणाने येऊ शकला नव्हता. गेटजवळ स्वत: राठी दोघींच्या स्वागतासाठी उभे होते.

या या.. ते तुमची जर्नी ऑल वेल नं? नाई रास्ता तसा चांगला आहे..

हो.. राठीजी एकदम छान झाला प्रवास.. राधा म्हणाली.

गेट मधुन आत आल्यावर त्या भल्यामोठ्या, नव्या=कोर्‍या रिसॉर्टचं दर्शन दोघींना झालं. समोरचा प्रशस्त परिसर एक-दोन तुरळक झाडं सोडली तर अगदीच ओका-बोका दिसत होता.

रिसॉर्टचं काम आता पुर्न झालय. पन मी स्पष्ट सांगून ठेवलाय बघा lawn अँड गार्डनचं काम मार्गी लागल्याशिवाय बूकिंग घ्यायच्या नाहीत..

राठी उत्साहाने बोलत होते.

रिसॉर्ट मधल्या प्रशस्त ऑफिस मध्ये तिघे येऊन बसले.

दोघींची व्यवस्थित सरबराई करून झाल्यावर राठींचं पाल्हाळ बोलणं थांबवत संपदा म्हणाली,

ठिके आम्ही जागा पाहून घेतो. माती, जमिनीचं texture वगैरे गोष्टी पहाव्या लागतील. त्यानुसार डिजायनिंग करावं लागेल. त्यानंतर रिसॉर्टही आतून फिरून पहावा लागेल. Indoor काय-काय करता येऊ शकतं त्याचीही चाचपणी आत्ताच केलेली बरी. आम्हाला पुन्हा-पुन्हा इथे येणं शक्य होणार नाही. काम आखून दिलं की आमचे अस्सिस्टंट्स मग पाहतील पुढचं सगळं.

रिसॉर्ट आतून? फोटोज पाहून नाही का होणार काम..

फोटोज पाहून? आम्ही काय पुण्याहून इथे तुमचं रिसॉर्ट फोटोत पहायला आलोय का राठीजी?’

संपदा प्लॉटचा नकाशा चाळत शांतपणे म्हणाली.

नाही तसं नाही.. त्याचं काय झालं काल रात्री उशिरा एक ग्रुप आलाय. आम्ही बूकिंग बंद आहे म्हणून किती सांगितलं तरी ते ऐकेचनात. खूप request केली. मग नाइलाजाने आम्हाला परवानगी द्यावी लागली. ते दोन दिवस राहणारेत..

काय? मग आम्हाला कशाला बोलावलंत? सांगायचं तसं आधीच. पोस्टपोण नसता का केला प्लान..

राधा आता चिडायला लागली.

नाही मॅडम त्याचं असं झालं की हे सगळं रात्री खूप उशिरा घडलं ना.. आणि सकाळी तर तुम्ही निघालात..

राठी गप्प.

बरं ठीक आहे! नॉट ए बिग इश्यू.. ते जे कोणी स्टे करतायत त्यांना request करा. आम्हाला फार वेळ नाही लागणार. अर्ध्या-पाऊण तासात होईल सगळं.

संपदा म्हणाली.

हां.. ठीक आहे. मी बोलतो. आधी बघतो ते आहेत का.. तोवर तुम्ही बाहेरचं पाहून घ्या.

राठी लगबगीने उठून गेला.

दोघी मग बाहेर आल्या. मॅप आणि प्रत्यक्ष परिसराचा अभ्यास सुरू झाला. कुठे-कसं-काय प्लान करता येईल, रिसॉर्टला सूट होईल आणि त्यांच्या अपेक्षांना खरं ठरेल असं डिजाइन कसं करता येईल आचे आडाखे दोघींच्या डोक्यात सुरू झाले. शिवाय त्या मातीत आणि वातावरणात कुठली कुठली नेटीव्ह प्लांट्स छान वाढतील याचाही विचार त्या करू लागल्या.

समोर काम आल्यावर संपदाच्या मनावरची मरगळ दूर झाली. आणि ती जोमाने कामाला लागली.

काम चालू असताना मध्येच राधा म्हणाली,

यू नो व्हॉट काल मी पुन्हा कांदे-पोहे खाल्ले. आठवड्यात दुसर्‍यांदा!

वॉव.. ग्रेट!

काय ग्रेट? नको वाटायला लागलेयत आता. एकदा ठरूदे लग्न, वर्ष-दोन वर्ष त्या पोहयांकडे वळूनपण पाहणार नाही!

हाहा..

‘anyways, तर सांगायचं हे होतं की मी आपलं हे काम त्यांना समजावून सांगितल्यावर त्या मुलाची मावशी मला माळी म्हणाली म्हणजे gradner!’

काय??’

हो.. असे भेटतात ना एक-एक.. हसूचं आलं मला. म्हणजे माळी असणं इज नॉट अ बॅड थिंग. बट आपलं काम फक्त तेव्हढंच नसतं हे कसं समजावणार ना..

हम्म.. खरंय..

 

अर्ध्या पाऊणतासाने त्यांचं डिसकशन चालू असताना त्यांना मागून राठी येताना दिसले.

ते झालंय बरंका.. त्या पोरांना काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही करू शकता तुमची पाहणी..

ओह ग्रेट.. इकडचं झालं की आम्ही येतोच तिकडे.. संपदा उत्तरली.

बरं ते सगळं तुम्ही करा तुमच्या मनाप्रमाणे.. सेक्रेटरी ने तुम्हाला रीक्वायरमेंट्स सांगितल्याच असतील समजावून. फक्त एक request आहे, ते सोनचाफ्याचं झाड मात्र लावा हा एक.. त्याचं काये माझ्या मिसेसना फार आवडायचं ते.. ते एक लावा. बाकी तुम्हाला हवं तसं करा..

राठीचा स्वर उगाचच आर्जवी झाला.

लाऊ की नक्की!! नका काळजी करू..

राधा आणि संपदा दोघी एकदाच म्हणाल्या.

 

थोड्यावेळाने बाहेरचं सारं आटोपून त्या रिसॉर्ट पहायला आत आल्या. रिसॉर्ट नवं होतं. इंटिरिअरही सुरेख केलेलं दिसत होतं. दोघी पूर्ण जागा फिरून पाहत होत्या. पाहत पाहत प्रशस्त हॉल पास करून व्हरांड्यातून संपदा वरच्या फ्लोर वर आली, तिथली प्रशस्त सामायिक बाल्कनी, झोपाळा पाहून तिथे बरंच काही करता येऊ शकतं याची नोंद तिच्या मनाने केली. आणि जराशी रेंगाळून ती अजून आत वळली. प्रशस्त बेडरूम्स आणि अध्ये-मध्ये मोकळी जागा, कॉफी टेबल्स अशी रचना होती. तिथून जाताना एका रूम पाशी ती थबकली. आतून आवाज येत होते. ओळखीचा आवाज?’ ती स्वत:शीच पुटपुटली. पण लगेच तो विचार झटकत पुढे सरकली..

फिरून पुन्हा बाल्कनी पाशी आली. तिथून खालचा परिसर न्याहाळताना अजून काही आयडियाज तिच्या डोक्यात तरळल्या. त्या राधाला सांगाव्या म्हणून ती झटकन वळली आणि खाली जायला निघणार इतक्यात मगाशीच्या रूममधून बाहेर पडलेला घोळकाही खाली जायला निघालेला होता. त्या गडबडीत संपदा त्यातल्या एकाला धडकता धडकता वाचली. जवळपास तिच्याच वयाचा तो तरुण तिला सॉरी म्हणाला. त्याला इट्स ओके म्हणत स्वत:ला ती सावरत असतानाच समोर एक ओळखीची आकृती विस्मयाने आपल्याचकडे पाहत उभी असल्या सारखा तिला भास झाला. पण तिकडे दुर्लक्ष करत खाली पडलेला फोन उचलायला ती वाकली आणि तिच्या कानांवर पुन्हा तोच ओळखीचा आवाज आला,

संपदा...?’

फोन हातात घेतानाच तिच्या डोक्यात वीज चमकून गेली, मंदारचा आवाज??

तिने झटकन वर पाहिलं आणि समोर तिच्याइतकाच विस्मयित चेहरा घेऊन उभ्या असलेल्या मंदार कडे पाहून चकित झाली..

 

 

क्रमश:

 


संजीवनी देशपांडे 

टिप्पण्या

Suharsha म्हणाले…
Khoopach chhan nehmipramane..
Sampada sobat amche engineering che days punha jagtoy ase vatatey.....
अनामित म्हणाले…
Thoda bore zaal. Kadachit jara mothya gap nantar post aalya muLe link tutali.
अनामित म्हणाले…
भाग खूप उशिरा येत असल्यामुळे लिंक तुटते आहे.
Tanuja म्हणाले…
Ha pan bhaag khup chhan zalay!
अनामित म्हणाले…
Majhi nahi baba link tutat pahila bhag punha vachaycha.. just kidding. Itaranni chidu naye..tyancha savdinusar lihitil ki. Ulat tyanna jast vel milala ki shabdrachna vagaire changli zamat asel. Ghya ghya tumcha vel ghya pan story matr tajeldar pahije...
Regards
Tich ti
12vi science vidyarthini
Suharsha म्हणाले…
Yes I agree. Link nahi tutat...
Waiting..
सुहर्षा, मन कस्तुरी रे, तनुजा.. थॅंक यू :)

लिंक तूटतेय आणि त्यामुळे बोअर झालं वाटणारे माझे अनामित वाचक, मी शक्य तितका प्रयत्न करतेय लवकरात लवकर लिहण्याचा पण नेहमीच ते जमतं असं नाही. तरी तुमच्या मताची नोंद मी घेतलीय :)

आणि आता माझी लाडकी 12th sci 'अनामित' वाचक, थॅंक यू.. प्रतिक्रिया आवडली :) बाकी कथा तजेलदार वगैरे होतेय की नाही हे तू कळवत रहा अधून-मधून ;) :)

लोकप्रिय पोस्ट