झरोखा.. दिगंत २.८
संहिता आलेली पाहून मी दचकून उठले. ती वैतागलेली होती ते दिसतच
होतं. मी काही म्हणणार इतक्यात तीच चिडून मला म्हणाली,
‘फोन कुठेय तुझा?’
‘काय?’
‘फोन. तुझा.’
हातातला, म्युझिक प्लेयर चालू असलेला फोन मी तिला दाखवला.
‘लागत का नाहीये तो?’
‘लागत नाहीये? कसं शक्यय!..’
मी आडव्याची उभी झाले..
‘..ओह हम्म.. दुपारी एरोप्लेन मोड वर टाकला होता. तसाचे वाटतं अजून..’
‘छान!! तो अनुराग, तुझी आई, तुझे अभ्यासू मित्र-मैत्रिणी दुपारपासून फोन करताहेत मला. माझं डोकं आधीच
फिरलेलं आहे आणि त्यात हे..’
‘ओहह.. हो का?..
..तू इकडे ये आधी. बस बरं इथे.. काय झालंय काय तुला?
कशावरून भांडताय तुम्ही दोघं एवढे?’
आता तिच्या चेहर्यावरचे भाव बदलले. रडवेली होऊन ती माझ्यासमोर
बसली.
‘काय सांगू.. आता काही उरलंच नाहीये सांगायला. सगळं सांगून टाकलं त्याने..’
‘काय? आणि कोणी सांगून टाकलं..’
‘त्याने गं त्याने.. तो बाहेर सोफ्यावर पडलाय ना तो.. सगळ्या जगाला सांगून
टाकलं आम्ही लग्न करणार आहोत असं..’
ती पुन्हा वैतागत होती.
‘काय?? सांगितलं म्हणजे काय केलं?’ माझे प्रश्न थांबत नव्हते.
‘जा न जाऊन त्यालाच विचार..’
तिने बाथरूमचं दार शक्य तितकं आदळलं.
मग पाहुच काय विषय आहे म्हणत मी हॉल मध्ये आले.
अनिकेत पॉपकॉर्न खात टीव्ही वर वेबसिरीज पाहत खिदळत बसलेला होता. कमालच
करतो हा. त्याच्या शेजारी बसून मीही मग त्या पॉपकॉर्नवर 50% शेअर जाहीर केला. समोरची
भन्नाट वेबसिरिज पाहण्यात मग मी इतकी गुंगले की आपण कशासाठी आलो होतो हेच विसरुन
गेले. काही वेळाने आतून आलेली संहिता खिदळत-चरत बसलेल्या आमच्या दोघांकडे पाहून
इतकी अफाट वैतागली की बास.
‘यूजलेस आहात दोघेही..”
ठरलेला डायलॉग.
आम्ही दोघांनी मिनिटभर गिल्ट चेहर्यावर झळकवत तिच्याकडे पाहिलं.
आणि पुन्हा बॅक टु सिरिज.
मग मॅडमनि टीव्हीच बंद केला ना येऊन. ‘ऐ..’
म्हणून आम्ही आता तिच्यावर ओरडणार पण मग समोर रखुमाईसारख्या उभ्या तिला पाहून गारच
पडलो.
आता हॉल मध्ये आम्ही तिघे. पिन ड्रॉप सायलंस. संहिताची रागात
अनिकेतवर खिळलेली नजर. मला आता जाम बोअर व्हायला लागलं. म्हणजे झालय काय कळायला
मार्ग नाही. अनिकेत कूल. संहिताचं प्रेशर कूकर. आणि मी? काय माहित. एकतर सकाळी उठून
त्या अनुरागकडे गेले. तिथे तो सीन. मग दिवसभर भटकले.
‘सांगणार आहात का काय झालय की जाऊ मी उठून आता?’
अनिकेत स्टिल कूल. संहिताने नजर वळवली. आणि मी आता उठणार हे पाहून
शेवटी म्हणाली,
‘आमच्या एका कलीगचं ठरलंय लग्न. त्यांनी सोशल साइटवर ते विडियो न ऑल टाकून
डिक्लेर केलं. तिथे खाली कमेंट्स मध्ये चर्चा रंगली होती बरीच. तर या साहेबांनी
चक्क तिथे कमेंटून टाकलं, मी आणि संहिता पण करतोय लवकरच लग्न
असं.’
मी क्षणभर अवाक. म्हणजे? याचा अन भांडणाचा काय संबंध?
‘तुला माहितीये माझी किती स्वप्नं होती? कसं-कसं आणि
कुठे शेअर करायचं सगळं ठरलं होतं माझं. आधी दोघांचं छान शूट करायचं प्रॉपर professionally आणि मग.. पण सगळी हवाच काढून टाकली याने.’
‘लाइक सिरियसली?? यावरून भांडताय तुम्ही दोघे? संहिता?’
अनिकेतने ‘थॅंक गॉड तुला तरी कळलं!’ अशा अर्थाचा लुक दिला. आणि
मग मी हसतच सुटले.
‘omg..
हे भयानक ए..’
‘मग काय तर.. मला तर केव्हापासून हसू येत होतं. दाबतोय मी ते. नाइतर अजून
त्यावरून भंडायची.’ अनिकेत सुटका झाल्यासारखा बोलत होता.
‘गपा रे तुम्ही. तुम्हाला नाही कळणार. सगळे असंच करतात आजकाल. मला त्या
सगळ्यांपेक्षा भारी करायचं होतं.’
‘अगं येडे.. लग्नात कर की काय करायचंय ते भारी-बिरी. त्याच्या declaration वरुन काय भांडताय वेड्यासारखे..’ असं म्हणत मी
काहीतरी खायला आणावं म्हणून फ्रीजकडे गेले. काय सगळे लग्न मेनियाक झालेयत आजकाल
काय माहित.
हातात बोल घेऊन बाहेर आले तर या दोघांसोबत समोर दत्त म्हणून
अनुराग उभा.
संहिता-अनिकेत माझ्याकडे पाहतायत आणि मी अनुरागकडे असा सीन.
तोंडातला घास गळ्याखाली उतरवून शक्य तितक्या सभ्यपणे, ‘अरे
अनुराग तू?’ असं वगैरे म्हणाले.
‘हो.. फोन लागत नाहीये तुझा. आम्ही सगळेच ट्राय करत होतो. मग संहिताकडून
कळलं की घरी आलीयेस. म्हणून मग आलो डायरेक्ट इथेच.’
‘ओह अरे एवढं काय त्यात. नाही लागत कधी कधी फोन. काळजी-बिळजी काय लगेच? चिल!’
यावर माझ्याकडे एक नजर फेकत तो जाऊन सोफ्यावर बसला. आणि समोरचे पॉप
कॉर्न खात शांतपणे म्हणाला,
‘आय अॅम चिल! बट अवर पेरेंट्स आर नॉट.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे तुझे आई-बाबा आणि माझे आई-बाबा उद्या अमरावतीहून इथे येतायत. त्यांनी
काढलेल्या तारखा आपल्याशी बोलून फिक्स करायला आणि एकूण सगळ्यांची एक कॅज्वल भेट व्हावी
या उद्देशाने.’
‘काय???’
यावर त्याच्याकडून फक्त एक थंड स्माइल.
मी खालीच बसले. ‘मला कोणीच कसं नाई सांगितलं काही? ठरवून टाकलं सरळ?’
‘दे वर ट्राईंग.. बट यॉर फोन...’
‘ओह गॉड..’
‘काय?’
मी एक disgusting नजर त्याच्यावर टाकत शांत राहिले. आता एक अवघड शांतता रूमभर पसरली होती. अनिकेत
आणि संहिता श्रोत्याच्या भूमिकेत होते. पण आता तेही चुळबुळायला लागले. शेवटी मग अनुरागच
संहिताला ‘हाय’ वगैरे म्हणाला. आणि अनिकेतशी
पण बोलला बहुतेक. ही त्या दोघांची पहिलीच भेट. संहिता मग काहीतरी खायला आणते म्हणत
आत गेली. इतक्यात माझा फोन वाजला. तो मी कानाला लावला. पलिकडे सम्या. तो जवळ-जवळ किंचाळत
होता. ही त्याची नेहमीची स्टाइल.
‘अगं आहेस कुठे सकाळपासून? बरं ऐक, आज-उद्या मध्ये कधीही रिजल्ट येण्याची शक्यता आहे. स्टे प्रीपेर्ड’
यावर अजूनच बधिर होत मी फोन ठेवला. रिजल्ट, लग्न, अनुराग, त्याचे आई-वडील, माझे आई-वडील.. डोक्यात नुसतं ट्रॅफिक
जाम झालं होतं. काही न सुचून उठून बाल्कनीमध्ये येऊन थांबले. रात्र. लुकलुकणारे दिवे.
गार वाराही येत होता अधून-मधून. काय करावं, कसं react व्हावं काही कळत नव्हतं. मेंस क्लियर झाले तर? या सगळ्यांना
काय सांगू? अजून काही महीने थांबा? मला
दिल्लीला जावं लागेल इंटरव्ह्यु preparation साठी. कसे react होतील सगळे? अनुराग? आणि फेल झाले
तर?? या विचारासरशी शरीरभर वीज चमकून गेली. पण यावेळी मी तो विचार
झटकला नाही. उलट ठिके नाही तर नाही. पुन्हा प्रयत्न करू. असाही विचार मनात येऊन गेला.
हे माझ्यासाठी नवीन होतं. नेगेटिव रिजल्ट च्या विचाराने denial mode मध्ये जाणारी मी आज चक्क सगळं शांतपणे अॅक्सेप्ट
करत होते. जो होगा देखा जाएगा टाइप्स मनोवस्था. मला एकाएकी एकदम हलकं वाटायला लागलं.
त्याच विचारात वळून आत हॉलमध्ये पाहिलं तर अनिकेत-अनुराग-संहिता एकदम रंगून जाऊन गप्पागोष्टी
करत होते. चेहर्यावरून संहिता नॉर्मल झालीये असं वाटत होतं. नाही म्हटलं तरी अनुराग
मधून-मधून gallery कडे पाहत होता. त्याच्याशी बोललं पाहिजे. खूप.
सगळं. प्रकर्षाने वाटून गेलं. आणि तेवढ्यात तोच माझ्या दिशेने आला.
‘कोणाचा फोन होता.. एनिथिंग सिरियस?’
माझ्याशेजारी उभा राहत त्याने विचारलं. मी जरासं हसून त्याच्याकडे
पाहिलं. आणि म्हणाले,
‘मित्राचा. आज-उद्या मध्ये रिजल्ट एक्सपेक्टेड आहे म्हणत होता.’
‘ओहह..’
तोही जरासा हसला. बाहेर पाहत म्हणाला,
‘टेंशन आलंय?’
‘हम्म.. टेंशन आलंय पण ते नक्की कशाचं ते कळत नाहीये..’
माझ्या बोलण्याचा रोख त्याला कळला असावा.
‘नको घेऊस. कशाचंच. जस्ट बी यू अँड बी रीयल.. एव्रिथिंग एल्स विल अॅडजस्ट accordingly.’
मी खजील होऊन त्याच्याकडे पाहिलं.
‘अशी काय पाहतेयस! चल फिरून येऊया थोडंसं.. बरं वाटेल.’
‘आत्ता?’
‘हो.. काय झालं. अशा शांत रात्री रस्त्यांवरून फिरण्यात वेगळीच मजा असते. चल.’
मी जरासं घुटमळून आत अनिकेत-संहिताकडे पाहिलं.
‘त्यांची काळजी करू नकोस. मिटलंय त्यांचं. दे आर प्लॅनिंग डिनर’ त्याने डोळे मिचकावत सांगितलं.
‘काय कसं मिटलं? आणि एक मिनिट तुला काय माहीत बिनसलं होतं
ते..?’
‘हाहा.. जादू..’ तो शांतपणे हसत म्हणाला आणि जायला निघाला.
आणि हसत-खजील होत मीही त्याच्यामागे निघाले..
संजीवनी देशपांडे
(Sorry for late :))
टिप्पण्या
Well what have you been up to
Well i was a bit lost. But now back with a bang. And will be writing regularly!
Thanks for your love. It keeps me motivated :)
ashich lihit raha :-)
हर्षदा, धन्यवाद. प्रयत्न तोच आहे :)