समुद्रायन
निसटणाऱ्या वाळूत घट्ट रोवलेले पाय जरासे सैल करत मी स्वत:ला
माझ्याकडे धावत येणाऱ्या त्या फेसाळत्या शुभ्र लाटेच्या स्वाधीन केलं..
ती आवेगाने येऊन बिलगली पायांना.. मी डोळे मिटले.. क्षणभर, अगदी
क्षणभरच तिच्यावर तरंगत असल्याचा फील आला.. ती अवस्था मनात
साठवेतो लाट निघूनही गेली परतून.. आणि माझे पाय पुन्हा वाळूत
रुतले.. समोर मावळतीचा सूर्य त्याचा तो क्षितीजावरचा रंगसोहळा
मिरवत होता.. शांत, नीरव किनारा.. फारशी गर्दी नसणारा.. तिथली
माझी खडकाजवळची ती आवडती जागा.. आणि लाटांसोबत चालू
असलेला आवडीचा खेळ!
येणाऱ्या प्रत्येक लाटेगणिक शहारणारी आणि जाणाऱ्या लाटांनी हलकी
हलकी होत जाणारी मनाची अवस्था..
शेक्सपिअरच्या ओळी मग ओठांवर येतात,
Come unto these yellow sands,
And then take hands:
Curtsied when you have, and kiss’d
The wild waves whist,
Foot it featly here and there;
And, sweet sprites, the burthen bear.
मन अजून अजून खोल जात राहतं. सरणाऱ्या वाळूवर मागे राहणारे
शिंपले खुणावतात.. तो ओल्या वाळूचा कॅन्व्हास बोलावत असतो.. पण,
त्यावर काही रेखावसं वाटत नाही. निमिषात ते पुसून जाणार असतं..
fading things often make me sad.. मी तशीचं पाहात ऊभी राहते..
मागे काहीचं उरणार नसतं.. हे जे काही आत्ता आपण अनुभवतोय, तेही
विरून जाणार आहे याची जाणीव होते. शब्दांत न मावणारे, रंगांत
चितारता न येणारे, कॅमेऱ्याच्या लेन्स मधूनही सुटून जाणारे हे क्षण
साठवावे कसे मग?
येणारी एक अजस्त्र लाट मग कानांपर्यंत उडी घेऊन म्हणते, ‘साठवायचे
नसतातच ते, जगायचे असतात!’
खरंच की..
आणि मग आठवते करंदीकरांची शाळेत वाचलेली कविता,
घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,
चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत..
ती लाट, मी, समुद्र, मावळणारा सूर्य सारंकाही एक झाल्यासारखं
वाटायला लागतं मग.. गार वारा अंगावरुन वाहत असतो.. समुद्राचा
खर्जातला सूर अव्याहत छेडलेला असतोच.. आणि ती भारलेली अवस्था!
नकळत मनात रामरक्षा उमटायला लागते..
... कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥..
आता तरंगण्यासाठी लाटेची आवश्यकता उरलेली नसते.. मन अल्लद
हवेवर तरंगत असतं!
लाटांचा आवाज.. पायाला जाणवणारा समुद्राचा अंश.. समोर जवळपास
मावळलेला सूर्य.. आणि मनाची ती मुग्ध अवस्था घेऊन मी परत फिरते..
त्यादिवशीपुरतं माझं समुद्रायन संपलेलं असतं..
आणि मग माझ्या मनाला ओढ लागते पुन्हा एका नव्या सूर्यास्ताची..
संजीवनी
टिप्पण्या
, te gelyacha vait vatla pan tyancha karyamule te nehmi aplyasobat astil, tya Kali te doctor zhale hi khup mothi gosht, mi 12vi pass zhale mala 80 percent alet ata engineering karnar ahe, tu kashi ahes, ajobancha pustak amhala kasa access karta yeil, tu Ashi vyakti ahes jichya shi kadhi na bhetata mi connect zhale. Hope u r doing good, and not just good but I wish u are living your life to the fullest. Mala reply kar pls ,tuzhe reply mala ek veglach anand deun jatat.
Yours lovingly
(Lavkarach nav sangen)
Your smile is very captivating.
Love you very much .
सर्वप्रथम खूप अभिनंदन आणि engg cet साठी शुभेच्छा. मस्त अभ्यास कर. संपीसारखा :)
तुझ्या comments वाचायला मलाही खूप आवडतं.
keep reading and writing back to me!
पुस्तकासाठी माझ्या 9860787611 ह्या नंबर वर कॉनटॅक्ट कर.
आणि bdw चुकून संजीवनी ऐवजी समृद्धी लिहलंयस तू :D