शब्दांची बूज राख बये..



शब्दांची बूज राख बये..

जे अनाहत सुचतात तेच खरे-चपखल असतात. छंद-वृत्त-मात्रा-बंध कशा-कशासाठी त्यांना मोडू नको.

कालचक्रात मुक्त वाहणार्या संवेदनांचे भाषा-विमुख तरंग शाईत भिजवण्याचा घाट घातलाच आहेस, तर बये, त्या तरल जाणिवांची बूज राख.. त्यांच्यावर कसलीही लेपणं न देता, आत शिरून त्यांचा गाभा जग.

निखळ पाण्याला, त्याचं निर्मळ असणं अबाधित ठेवत, अलगद ओंजळीत घेणं का सोपं वाटलं तुला? त्यासाठी ओंजळही तितकीच तरल हवी, स्थिर, मुरलेली हवी. आधी हाताला लागलेले दगड-गोटे आपलेसे केलेली हवी.

युगानुयुगांचा गर्भित अंधार पार करून मनाच्या तळातून वर पोहत येणार्या या ओळी, हे शब्द अनाठायी नाहीत. त्या अर्क आहेत तुझ्या अस्तित्वाचा. संचिताचा. त्याच तुला वाट दाखवतील आणि वांछित मुक्कामीही पोचवतील.

आणि म्हणूनच,
बये,
त्यांची बूज राख.


संजीवनी

#शब्दब्रह्म #शब्दगुरू #गुरूपौर्णिमा #gurupoornima
 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
हे सुरेखच आहे!

By the way- संपीचं काय झालं पुढे?
अनामित म्हणाले…
संजू ताई, हे तर तू मस्तच लिहलय...
पण त्या संपी च काहीतरी कर😅 ती सुरू झाली होती त्या वेळी मी ही अगदी तिच्याच वयाची होते, आणि तिच्या कथेचा वेग ही असा आहे ना की आम्ही दोघी सोबतच वाढत आहोत...
लिही ग ती कथा पटापट, दररोज तुझा ब्लॉग चेक करतेय मी!
अनामित म्हणाले…
तुम्ही वाचकांना सरळ सरळ ignore करताय! निदान एखादा रिप्लाय तरी द्या पुढील भाग लिहायचा नसेल तर.
@अनामित१ : थॅंक यू! संपी इज बॅक.

@अनामित२ : थॅंक यू :) तू म्हणजे १२th sci student का गं? bdw, कमेन्ट फारच गोड आहे.

@अनामित३ : अजिबात नाही. taking my readers granted is the last thing i'll do. I
never intended that. was having some medical issues which i cannot
explain here. writing was simply impossible in that phase. even I
rarely visited my blog in recent months.
अनामित म्हणाले…
तू म्हणजे १२th sci student का गं?>>> नाही गं! bdw, कमेन्ट फारच गोड आहे>>
Thank you ♥️

लोकप्रिय पोस्ट