संपी आणि तिचं धमाल जग : भाग ४४



    वरच्या फ्लॅटमधल्या टिनपाट पोरांनी सुसाट आवाजात सोनेरी लाटा, रुपेरी वाळू.. पासून ओ अंतव्वा पर्यंतची कमाल रेंज मधली गाणी सुरू ठेवलीयेत आणि खालच्या फ्लॅट मधून काणे आजोबा त्यांना दुर्बोध शिव्यांची यथेच्छ लाखोली वाहतायत असं स्वप्न पाहत असताना कितीतरी वेळ वाजत असलेल्या बेल ने जाग येऊन संपदा दार उघडायला गेली. आपण पाहिलं ते स्वप्न होतं आणि वास्तवात काणे आजोबांनी लावलेलं कौसल्या सुप्रजा राम पूर्वा.. एकदम हाय पिच मध्ये सुरू आहे आणि वरच्या गॅलरीत उत्तररात्री येऊन आडवं झालेलं कोणीतरी झोपेतच त्याला भ च्या भाषेत मम म्हणतंय हे समजायला तिला मिनिटभर लागला. डोळे चोळत दार उघडताना काय तर स्वप्नं पडायला लागलीयेत आपल्याला! असा आशाळभूत विचार आलाच तिच्या मनात.

किती वेळ गं दार उघडायला? मला तर वाटलं मेलीस!

दारात उभ्या राधाला, ठरलेला राग आणि irritation युक्त लुक देत संपदा आत येऊन सोफ्यावर आडवी झाली.

इतक्या पहाटे कशी उगवलीस तू?’

भांडून आलेय मी.

कोणाशी?’

‘……’

हे बघ मी सतरा वेळा विचारण्याच्या मूड मध्ये नाहीये. पटकन बोल काय झालंय.

संपदा यार तू पण नं. मी जाम चिडलेय गं म्हणजे नं वैतागलेय.

बर

बर काय बर! मला सांग इंस्टा प्रोफाइल हे काय एखाद्याला रीजेक्ट करण्याचं कारण असू शकतं?? आय मीन seriously??’

लोल.. वॉव! नया है यह. गो ऑन.. आडव्याची उठत बसत संपदा म्हणाली.

‘exactly! आई-बाबांना प्रचंड आवडलेलं एक स्थळ होतं. So basically that guy went on with casual talks instead of typical kande-pohe program. मी म्हटलं वाह cool.  Then next day, I got a random text from him asking about my insta Id.’

‘well.. मग?’

मी म्हटलं मी नाहीये इंस्टा वर

हम्म.. मग?’

मग काय अरे तो असा काही react झाला जसं काही माझं बँक अकाऊंट नाहीये! Is it so basic to have.. insta profile? Oh god!’

‘haha.. pudhe?’

पुढे काय he just stopped talking. And next day, ‘योगनसल्याचा निरोप आला त्याच्या घरच्यांकडून. बाबांनी कारण विचारलं तर म्हणे मुलीचा सोशल मीडिया प्रेझेंस फारसा अपीलिंग नाहीये!

असे पण नमुने असतात काय ह्या मॅरेज मार्केट मध्ये? कमाल आहे!

कमाल तर पुढे आहे. हे सगळं झाल्यावर एरवी सतत हातात दिसणार्‍या फोन वरुन मला बोलणारे माझे आई-बाबा, तू इंस्टा वर अकाऊंट काढ म्हणून माझ्या मागे लागले. Can you believe this?’

हाहहा.. ग्रेट. हे फार भारीये. हटके. हसून पोट दुखायला लागलं माझं. पण bdw, का नाहीयेस तू इंस्टा वर?’

डोन्ट नो यार. इंस्टा वर तसा फील येत नाही गं. जसा fb वर यायचा. आय मीन काही वर्षांपूर्वी ऑब्वियसली. आजकाल fb ना सोशल कमी मार्केटिंग साइट जास्त वाटते. आणि आता तिथे 50-60+ क्राऊड चा होत असलेला भरणा. म्हणजे कधी-कधी ओल्ड एज सेंटर वाटतं माहितीये! सगळे नातेवाईक हजर. आपल्यावर वॉच ठेवत. नो प्रायवसी अॅट ऑल.

हम्म this is seriously a case. More or less our whole generation feels the same. ना घर के घाट के टाइप्स. Fb ओळखीचं वाटत नाही आणि insta वगैरे वर millennials चा भरणा.. they are like pro in all these things.’

‘Exactly!’

हम्म अरे fb वरुन आठवलं..

संपदा बोलता-बोलता एकदम थांबली आणि फोन शोधायला लागली.

मेलेला फोन चार्जिंग ला लावून जीवंत होईपर्यन्त तिच्या जीवात जीव नव्हता. फोन ऑन झाल्यावर पटकन तो unlock करून तिने messenger उघडलं. आणि हो. Seriously. रात्री खरंच मंदारचा मेसेज आला होता आणि आपण पण खरंच त्याला चक्क रीप्लाय केला याची सकाळच्या पूर्ण शुद्धीत तिला जाणीव झाली. असं का होतं म्हणजे? रात्रीच्या शांत अंधारात एकदम लॉजिकल, छान वाटणार्‍या गोष्टी सकाळच्या लख्ख उजेडात वेडगळ का वाटायला लागतात!

तसाच फोन हातात घेऊन संपदा खाली बसली. डोळे स्क्रीनवर. अर्थात मंदारचा रीप्लाय आलेला होता.

कशी आहेस?’

आणि त्यानंतरचा मेसेज deleted होता.

संपदाने फोन बाजूला ठेवला. राधाकडे पाहिलं. ति पाहतच होती हिच्याकडे. संपदाने मग उत्तरादाखल तिला फोन दाखवला.

‘I knew this. त्यादिवशी पाचगणीत तो ज्या पद्धतीने तुझ्याकडे पाहत होता नं. पता था मुझे. काय मग? काय ठरवलंयस?’

आय डोन्ट नो यार.. काही कळत नाहीये मला.

लिसेन टु मी, गिव हिम ए सेकंड चान्स.

व्हॉट? तुला माहीत नाहीये तो कसा वागलाय.

हम्म.. खरंतर मला माहितीये. म्हणजे परवा रात्री तुझी जुनी डायरी वर पडली होती. ती... मी... चुकून... वाचली.

क्काय? राधा!! How could you?’

संपदा जागची उठली.

‘actually, i did. आणि आता माझ्यावर किंचाळण्यापेक्षा you should thank me, ते सगळं तू मला सांगत बसण्यासाठी लागणारा वेळ आणि कष्ट दोन्ही मी वाचवलेत. आता त्या कशी आहेस?’ ला काय रीप्लाय देणारेस ह्याचा विचार कर.

हम्म.. पॉइंट एडोकं खाजवत संपदा खाली बसली. आणि मग पुन्हा आपल्या वेंधळेपणावर चरफडत राधाकडे खाऊ की गिळू नजरेने पाहू लागली.

संपदा, ऑन अ सिरियस नोट, तो जे वागला ते खूप वाईट होतं आय नो. तुझ्या जागी कोणीही असतं तर चीड येणं साहजिक आहे. पण तू जशी react झालीस तेही बालिश होतं. राग आला तर भांडायचं नं. जाब विचारायचा असं का केलंस तू म्हणून. हे असं म्यूट मोड मध्ये जाऊन इतक्या वर्षात तू काय मिळवलंस? तू मुव ऑनच होऊ शकलेली नाहीयेस. कारण तो चॅप्टर तू नीट क्लोज नाही केलास.

‘…..’

तू बोल त्याच्याशी. मोकळेपणाने बोल. अँड काही नाही तरी अॅट लीस्ट closure मिळवण्यासाठी तरी बोल. म्हणजे पुढे तरी जाऊ शकशील. किती दिवस तिथेच अडकून पडणार आहेस?’

‘…..’

संपदा काही न बोलता फक्त ऐकत होती. आणि राधाचं बोलणं तिला मनोमन पटतही होतं. कारण इतके दिवस ती स्वत: जे स्वत:पाशी बोलायला कचरत होती तेच आज राधा बोलत होती.

राधा कडे पाहत तिने फक्त होकारार्थी मान हलवली.  

 

संजीवनी देशपांडे

 

 

 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
असे वाटले जसे काय दिगंत या कथामालिकेचा च एखादा भाग वाचतेय की काय...तरीही नेहमीप्रमाणे मस्तच🙂
अनामित म्हणाले…
Chan chaluye... Pudhil bhagachya pratikshet...
अनामित म्हणाले…
रोज एक भाग येणार होता ना या सिरीजचा?
अनामित म्हणाले…
संपीची ही गोष्ट फार गुंतवून ठेवणारी आणि रिलेटेबल आहे. पहिल्या भागापासून आत्तापर्यंत सलग वाचून काढली. तुम्हालाही काही अडचण असेल/ सुचत नसेल म्हणून लिहीत नसाल, पण एकदा "रोज नवीन भाग येईल" असं सांगितल्यावर तो पोस्ट न करून कसं चालेल? तुमचे वाचक पुढच्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात असतात.
अनामित म्हणाले…
काहीही असो पण ही गोष्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचे लिखाण वाचणार नाही.तुमच्या कितीही प्रामाणिक वयक्तिक अडचणी आहेत मान्य आहे .त्या अडचणी नंतरही येतील आणि तुमचे रोज एक येणारे भाग चार चार महिन्यांनी येतील त्यामुळे कथा ना वाचलेलीच बरी
Sanjeevani म्हणाले…
सगळं मान्य आहे. मनापासून माफी मागते
अनामित म्हणाले…
Pudhil bhag kdhi yenar???

लोकप्रिय पोस्ट