मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

संपी आणि तिचं धमाल जग - भाग : ४७

  वाटेत एक-दोन भाज्या घेऊन संपी घरी येईतो घड्याळात सात वाजून गेले होते. आई टीव्ही वर काहीतरी पाहत बसली होती. आल्या-आल्या हातातल्या भाज्या आईला देत संपी म्हणाली , ‘ आई , आज मस्त भरीत कर वांग्याचं. ही बघ वांगी आणलीयेत मी छान. ’ आईने संपीकडे क्षणभर पाहिलं आणि पुन्हा टीव्ही कडे पाहत ती म्हणाली , ‘ मी नाही तू करणारेस ‘ मस्त भरीत ’.’ ‘ का ?’ ‘ का काय.. मी तुझ्याकडे आलेय. करून खाऊ घाल मला. मी काहीही करणार नाहीये. तिकडे तू घरी आल्यावर करते नं मी ? आता तू कर. पाहू काय दिवे लावतेस. ’ ‘ ए आई असं काय. कंटाळलेय मी बाहेरचं आणि माझ्या हातचं खाऊन. कर नं. ’ ‘ कंटाळले काय कंटाळले ? उद्या घरी पाहुणे आले तर त्यांना असंच म्हणणारेस का ? कर मुकाट. ’ ‘ तू काय पाहुणी आहेस का ?’ ‘ नाही. आई आहे. माझ्यासाठी तर आधी करायला हवंस. बरं , भरीत करतेच आहेस तर मस्त मठ्ठा पण कर. दही दिसतंय फ्रीज मध्ये बरंच. ’ आईच्या त्या अजेंड्या पुढे मनात भरीत-भाकरीचे चविष्ट तुकडे मोडत आलेली संपी हताश होऊन वांगी उचलून आत गेली. आवरून आईवर चरफडत स्वयंपाकाला लागली. पण लक्ष का कोणास ठावूक सारखं फोनकडे जात होतं. एरवी

नवीनतम पोस्ट

संपी आणि तिचं धमाल जग - भाग : ४६

संपी आणि तिचं धमाल जग - भाग : ४५

राखी पौर्णिमा